प्रथम, ह्या साईट संचालकांची माफी मागतो कारण हा विषय वेगळा पण अती म्ह्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था आहेत परंतु या संस्था मध्ये होणारा नोकर भरतीचा बाजार आता थांबवला पाहिजे. या शिक्षण संस्था मध्ये संस्थाचालकांचे नातलगच भरती केलेले दिसतिल आणि या शिवाय ज्यांना नॉकरी हवी त्यांच्याकडे १०-१५ लाख रुपये असावे लागतात मग भले त्यांच्याकडे गुणवत्ता असो वा नसो. मग अशा गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांकडुन गुणवत्तेची अपेक्षा तरी कशी करावी.
या शिक्षण संस्थानां सर्व अनुदान शासन देते तेथील शिक्षकांचे वेतनही शासन देते, परंतु तेथील नोकर भरती संस्थाचालक करतात आणि गुणवत्ता नसलेल्या लोकांची भरती करतात तसेच १०-१५ लाख रुपये कमावतात या मुळे शैक्षणिक बाजार होतो. गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांकडुन विध्यार्थी घडत नाहीत उलट नक्क्ल करण्याचे प्रमाण वाढत आहे. हे सर्व प्रकार होत असल्याने एका बाजुला बेकारी (D.ed,B.ed,M.ed,MA,M.com) वाढत आहे. म्हणुन ही खाजगी शिक्षण संस्थानां मधली नोकर भरती शासनाने करावी या साठी कांही ठोस करण्याची गरज आहे.
जर आपणही या विचाराशी सहमत अहात तर माझ्याशी संपर्क करा.
ई-मेलः kumardeshpande2005@gmail.com
मो. नं: ९०९६३५८९६६