
मायक्रोसॉफ्टने आज दिनांक ३ जुन २००९ रोजी बिंग या आपल्या नव्या सर्च इंजिनचा थाटामाटाने श्रीगणेशा केला आहे. विंडोज लाईव्ह सर्चचा हा पुढचा व्हर्जन असणार आहे. इंटरनेट सर्च व्यवसायातले गुगलचे अनिभिषिक्त सम्राट म्हणुन तयार झालेल्या लौकिकाला हे सरळ सरळ आव्हान असावे. हे फक्त सर्च इंजिन नाही तर हे डिसिजन इंजिन आहे अश्या शब्दात मायक्रोसॉफ्टने त्याची जाहिरात त्यांच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर केली आहे. बिंगचा वापर सुलभ व्हावा अधिकाधिक आकर्षक व्हावा म्हणुन बिंगचा युजर इंटरफेस सिल्व्हरलाईट तंत्रज्ञानवर आधारीत आहे.
बिंग वापरुन आणलेले सर्च रिझल्ट पहातांना फारच युजर फ्रेंडली वाटले, विषेशकरुन इमेजसर्च उत्तम !!
मायक्रोसॉफ्टची बिंग टिम काय म्हणतेय ते इथे पहाता येईल.
बिंगः http://www.bing.com
बघितल ते सर्च ईंजिन अजुन बीटा व्हर्जन आहे आणी गुगल एव्हड एडव्हान्स नाहि आहे ते अजुन हि ते विंडोज लाईव्ह सारखच आहे काहिच नविन नाहि वाटत त्यात मला नाहि वाटत गुगलच्या साम्राज्याला धक्का देउ शकेल ते