क्लाऊड कॉम्प्युटिंग हे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे भविष्य आहे. थोडक्यात त्याबद्दल सांगण्यासाठी एक उदाहरण पाहू.
पूर्वी मराठीतून टाईप करण्यासाठी आपण आकृती इंजिन, अथवा बारहा सारखी सॉफ्टवेअर वापरत असू. यापैकी काही सशुल्क होती, तर काही मोफत होती. पण ही सर्व सॉफ्टवेअर्स आपल्या संगणकावर इंस्टॉल करावी लागत असत. आता ग.म.भ.न. पहा: ह्याला सॉफ्टवेअर प्रॉडक्ट पेक्षा वेब सर्व्हिस म्हणावे लागेल. ग.म.भ.न. मोफत आहे, इंटरनेट वरून वापरता येते, आणि त्यासाठी कुठलेही इंस्टॉलेशन वापरावे लागत नाही. ही वेबसाईट, मिसळपाव, इ. साईट्स त्यावरच आधारित आहेत.
क्लाऊड कॉम्प्युटिंगची इतरही अनेक उदाहरणे आहेतः उदा. गूगल स्प्रेडशीट्स. एक्सेल ची सगळी सोपी कामे गूगल स्प्रेडशीट्स करू शकते - सोपे फॉर्म्युले वगैरे वापरता येतात. पुन्हा पहा: मायक्रोसॉफ्ट एक्सेल विकत घेऊन इंस्टॉल करावे लागते, आणि तुमची माहिती तुमच्याच हार्ड डिस्कवर असते, तर गूगल स्प्रेडशीट्स मोफत आहे, इंस्टॉल करावे लागत नाही, माहिती आंतरजालावर असते, आणि सहज शेअर करता येऊ शकते.
हल्ली मी माझे सगळे फोटो पिकासावर टाकतो. पूर्वी मी ते कॉम्युटरवर साठवत असे.
ही सगळी किमया आंतरजालाची आहे. हल्ली ब्रॉडबँड इंटरनेट २४ तास बर्यापैकी कमी किमतीत मिळू शकते. अधिक वेगवान नेटवर्कमुळे अधिकाधिक ऍप्लिकेशन्स आंतरजालावर टाकणे शक्य झाले आहे. हीच भविष्याची दिशा आहे. जसजसा काळ जाईल, आपण अधिकाधिक कामे आंतरजालावर हलवत जाऊ. शेवटी आपल्या संगणकात वेब ब्राऊझर हेच एकमेव ऍप्लिकेशन शिल्लक राहील. बाकी सगळी कामे आपण ऑनलाईन करू. माझ्या मते हे सगळं ४-५ वर्षात तरी होईल.
क्लाऊड कॉम्प्युटिंगमु़ळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्रॉडक्ट्सकडून वेब सर्व्हिसेसकडे अशी ह्या क्रांतीची दिशा आहे. ज्या प्रॉडक्ट कंपन्या बदलणार नाहीत, त्या कालौघात गडप होतील. अगदी मायक्रोसॉफ्टही बर्यापैकी मार खाऊ शकते. अर्थात मायक्रोसॉफ्टनेही आता ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या आहेत http://www.microsoft.com/online/default.mspx पण फुकटातल्या सेवांपुढे त्या टिकाव धरतील का शंकाच आहे.
(अवांतरः अमेरिकेतील वाचक, जे व्हॅल्यू इंन्व्हेस्टर्स आहेत, ५-६ वर्षाच्या होरायझनसाठी क्लाऊड कॉम्युटिंग कंपन्यांत गुंतवणूक करू शकतात)
क्लाऊड कॉम्प्युटिंग बद्दल इतकी सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अनिकेत.
गुगल स्प्रेडशिट कश्या वापरता येतिल या संदर्भात एखादा लेख होउन जाउद्या राव !
माहिती छानच आहे. येथे भारतात आधी वीज नाही, मग २४ तास इंटरनेट हि फार दुरची गोष्ट आहे. पायाभुत सुविधा चांगल्या झाल्या तर हे फार उपयोगी आहे.
मला तुझा लेख आवडला. ग.म.भ.न. मात्र वेब सर्व्हिस नसून API (Application Programming Interface) आहे. म्हणजे वेब सर्व्हिस एक standard आहे, आणि API standard असेलच असे नाही.
Google Maps is an API while Currency Converters are web services.
दोघा मधला फरक मात्र कमी आहे.
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. तांत्रिक ज्ञानात माझी थोडी गडबडच आहे..
स्वप्निल चुक दुरुस्त केल्याबद्दल आभार.
गमभन ही लायब्ररी आहे, किंवा सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे. तुमच्या वेबपेज वर ते कसे वापरता येईळ याची अत्यंत सुंदर प्रकारे माहिती इथे सापडेल.
स्वप्निल तुम्ही वेबसर्विसेसनी इंटरनेट विश्वात घडवुन आणलेल्या क्रांती संदर्भात लिहलेत तर वाचकांना उत्तम माहिती मिळेल.
मला लिहायला आवडेल. मी नक्कीच येत्या काही दिवसात याबद्दल लेख लिहीन.
धन्यवाद.
छान माहिति आहे....
अनिकेत तुम्ही फारच उपयुक्त माहीती पुरवली आहे.
आनंदयात्री म्हणतात तसेच गुगल स्प्रेडशिटसंबंधी माहीती देणारा लेख(ट्यूटोरीयल) लिहावा अशी विनंती!
खरच उत्तम महिती पुरवली आहे.
धन्यवाद
खुप महत्त्वाचि माहिति आहे