नमस्कार लोकायती मित्र मैत्रीणींनो,
सर्वप्रथम आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल मनापासुन आपले आभार मानतो. आपण असेच वरचेवर इथे येत रहा आणी मराठी माणसाला फक्त संगणक साक्षर नव्हे तर एक्स्पर्ट बनवण्यासाठी हातभार लावत रहा ही विनंती.
हे निमित्त साधुन इथे वावरतांना खाली निर्देशिलेल्या काही साध्या गोष्टींचे पालन व्हावे ही सादर विनंती.
१. आपले लेखन मराठी भाषेतुनच व्हावे असा लोकायतवर वावरतांना आग्रह आहे/असेल. कृपया याच्या अनुषंगाने आपले लेख, प्रश्न, प्रतिसाद कृपया मराठीतच टंकावे.
२. इथे कोणत्याही प्रकारच्या अर्थिक व्यवहार अंतर्भुत असणार्या व्यवहाराच्या, सेवेच्या जाहिरातीला बंदी आहे. लोकायत डॉट कॉम अशा जाहिरातींचे अधिकार पुर्णपणे स्वतःकडे राखुन ठेवते आहे. अश्या प्रकारची कोणतीही जहिरात आढळल्यास ती तत्काळ तसेच कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय उडवली जाईल. अशा विषयींच्या प्रस्तावांशी अथवा कोणत्याही बाबींशी लोकायत व्यवस्थापन जबाबदार नाही.
३. इथे कोणत्याही प्रकारच्या पायरेटेड, कॉपीराईट हक्काचे उल्लंघन करणार्या सॉफ्टवेअर्सच्या तसेच ई साहित्याच्या लिंक्स देउ नयेत तसेच फोरम्स मधुन तशी कुणी मागणीही करु नये. अशा प्रकारचे लिखाणही कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय उडवले जाउ शकते. याएवजी नेमके प्रश्न विचारले जावेत, ते कोणत्याही तंत्रज्ञानाशी निगडीत असले तरी त्याचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल हा विश्वास असावा.
४. इथे फक्त संगणक आणी निगडीत तंत्रज्ञानाबद्दलचेच लिखाण अपेक्षित आहे, राजकिय विषयांवरील चर्चांना इथे पुर्ण बंदी आहे. अशा प्रकारचे लिखाणही कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय उडवले जाउ शकते. अशा विषयींच्या प्रस्तावांशी अथवा कोणत्याही बाबींशी लोकायत व्यवस्थापन जबाबदार नाही.
.
आपले सहकार्य अपेक्षित आहे. याचबरोबर इथे सर्व लोकायतींना त्यांचे सदस्यनाम मराठीत बदलुन घेण्याची विनंती करतो. डाव्या समासात असलेल्या माझे खाते- संपादन इथे जाउन आपले सदस्यनाम बदलु शकता. आपल्याला कोणत्या एखाद्या विषिष्ठ विषयावर माहिती हवी असेल तर आपण त्याची जरुर मागणी करा, लोकायत व्यबस्थापनाला ती माहिती पुरवण्यात आनंदच होईल. आपल्या कोणत्याही अडचणीसाठी team@lokayat.com इथे निरोप करा.
आपले विश्वासु
संपादक मंडळ
लोकायत डॉट कॉम
घरचा संगणक बिघडला तर आता अभियन्त्याला बोलावन्याची गरज नाही.
अगदी हाच हेतु आहे हे संस्थळ सुरु करण्यामागचा ....
त्याबरोबरच आणखी काही माहिती हवी असल्यास वा तुमच्याकडे असलेली माहिती शेअर करण्याची जर इच्छा असेल तर त्याचेही स्वागत आहे...
आणि हो, संगणक बिघडुस्तोवर वाट नका पाहु उलट "बिघडु नये म्हणुन काय करावे?" ह्यावर चर्चा करा, काय ?
>>आणि हो, संगणक बिघडुस्तोवर वाट नका पाहु उलट "बिघडु नये म्हणुन काय करावे?" ह्यावर चर्चा करा, काय ?
असेच म्हणतो! :)
आम्हाला बोलवा ... संगणक बिघडला की .... आम्ही फुकटात काम करून देउ... फक्त २०० रुपये सर्व्हिस टैक्स पडैल
घरचा संगणक बिघडला तर आता अभियन्त्याला बोलावन्याची गरज नाही.
पण मग तुम्ही लोकायतवर येणार कसे? ;-)
बाकी छोटा डॉन म्हणतो तसं संगणक बिघडण्याची वेळच येणार नाही याची काळजी घ्या. :-)
It's an very good station for the marathi peoples they can get any tyupe of information abut computer
मला विचाराना राव
घरचा संगणक बिघडला तर आता अभियन्त्याला बोलावन्याची गरज नाही.
पण मग तुम्ही लोकायतवर येणार कसे? ;-)
मी हाय ना ईथ
लोकयत च्या सर्व सम्पादक मन्ड्लीचा मी प्रथम आभार व्यक्त करतो तसेच या सन्केत स्थलाशी नाते जोड्ल्या बद्द्ल अनेक तरुण,तरुणी व मनाने तरुण असलेल्या अनेक वाचकाचाही आभारी आहे.आपण सर्व़जन मिळुन मराठी माणसाची प्रतिमा उन्चाऊ व लोकायत ची ताकत बनुया.
नम्स्कार्,मा़झ्या कडे सगणक ६महीन्या पासुन आहे.मला फक्त सगणकाचि माहिती वाचायचि आहे.
संगणक आणि तंत्रज्ञान विषयाला वाहून घेतलेले हे संस्थळ आजच पाहण्यात आले.लगेचच सभासद्त्व घेतले. मराठीतून अशी सर्व तांत्रिक माहिती देण्याचा हा अतिशय छान आणि उपयुक्त उपक्रम आहे.
अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!!!!
मला इन्टरनेतच कसा करावा याबाब्त् यौग्य माग्द्शन करावे
सर्व लोकायत टीम चे मनापासुन हार्दिक अभिनंदन,
मराठी माणसाकरीता संगणकाबाबतची ईथंभुत माहीती लोकायत या संके तस्थळा वरुन मीळ्त आहे. तसेच या संकेत्स्थळावर मण्मोकळेपणाने आपले वीचार मांडता येतात. हीच खरी या संकेतस्थळाची उपलब्धी आहे.
पुनश्च मनपुर्वक अभिनंदन !
लोकायात वर जेव्हा ctrl + \ भाषा बदलण्यासाठी दाबतो तेव्हा पुर्ण लेखच सीलेक्ट होतो कींवा करसर खालच्या ओळीत जातो ..
याणे एखाद्या वेळेस घाईघाईत पुर्ण लेखच चालला जाण्याची शक्यता आहे . कीवा करसर खालच्या रांगेत गेल्याने टायपिंग करतांनी माउस ला हात लावावा लागतो ...
तसेच मला खुपदा प्रतिसाद देतांना
Unable to send e-mail. Please contact the site admin, if the problem persists.
हा एरर मीळतो
सर्व लोकायत टीम चे मनापासुन हार्दिक अभिनंदन,
कंप्यूटरच्या प्रोग्रामिंग भाषेवर लेख सुरु करावे ही विनंती
मला मराठी भाषेतून ई-वृत्तपत्र स्वरूपाची वेबसाईट सुरू करायची आहे. वेबसाईट युनिकोड स्वरूपाची असावी असा विचार आहे. त्यासाठी सर्व्हरवर जागा घेणे, डोमेन घेणे या गोष्टी करण्यासंदर्भातील मार्गदर्शन हवे आहे. याशिवाय आणखी काय करावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
मला मराठी भाषेतून ई-वृत्तपत्र स्वरूपाची वेबसाईट सुरू करायची आहे. वेबसाईट युनिकोड स्वरूपाची असावी असा विचार आहे. त्यासाठी सर्व्हरवर जागा घेणे, डोमेन घेणे या गोष्टी करण्यासंदर्भातील मार्गदर्शन हवे आहे. याशिवाय आणखी काय करावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
कृपया vikas_shirpurkar1@webdunia.com किंवा vikas_shirpurkar@in.com वर संपर्क साधावा.
If people want to see more facts about this post, they should order term paper or buy essays at the essay writing service.
Lots of times people wanted to buy superb thesis topics just about this good topic in the dissertation writing services. Can you please point at the professional thesis service? Thank you very much.
I think that at present time really need custom essay co uk about this post, because that is our deal to supply all people with the supreme information connecting with costs.
It's not so simply to bring a good enough custom essay, essentially if you are booked. I advise you to define buy an essay and to be devoid from discredit that your work will be done by essay writers
This is good that you do such great thought. I think that this would be good if some people receive the custom essay and term paper from you.
जोतिष कस आ़ह॓