नमस्कार,

या संकेतस्थळावर तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत. इंटरनेटवर मराठीसाठी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती व गटांचा एकत्रित परिचय करून द्यावा, वेगवेगळ्या ठिकाणी चाललेल्या प्रकल्पांची माहिती करून द्यावी. सोबतच नवनवीन तांत्रिक घडामोडींवर प्रकाश टाकावा. विविध तांत्रिक (संगणकीय) विषयांवर मराठीतून लेख लिहावेत. अशी या संकेतस्थळाची संकल्पना.

येथे मराठीतून सहज समजतील असे मार्गदर्शक लेख असतील. मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा परिचय असेल. मराठीतल्या महत्वाच्या संकेतस्थळांचा परिचय, त्यांची वैशिष्ट्ये व कार्यपद्धती आदींची माहिती असेल. तुम्हाला कुठल्या विशिष्ट विषयावर माहिती हवी असेल तर त्याबद्दल लिहू शकता. तुम्हाला लेख लिहायचे असल्यास ते सुद्धा येथे सहज लिहू शकाल.

तसेच संगणक आणि इंटरनेट वर मराठीसाठी चाललेल्या कामांचा एकाच जागेहून मागोवा घेण्याचं काम येथे होईल.

तुम्ही सुद्धा या प्रकल्पात सामील व्हा. सदस्य व्हा. प्रश्न विचारा, इतरांच्या शंकांना उत्तरे द्या.

धन्यवाद.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content